नवी दिल्ली : "मेडटेक मित्र हे एक असे व्यासपीठ आहे जे देशातील तरुण प्रतिभावंतांना त्यांचे संशोधन, ज्ञान, तर्कशास्त्र इत्यादीं क्षेत्रात पाठबळ देत नियामक मान्यता मिळविण्यात मदत करेल", असा विश्वास केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडवीय यांनी व्यक्त केला.
ते म्हणाले, "वैद्यकीय उपकरण क्षेत्र हा भारताच्या आरोग्य सेवा क्षेत्राचे एक आवश्यक आणि अविभाज्य घटक आहे. विकसित भारताच्या दृष्टीकोनाचा पाठपुरावा करत, २०४७ पर्यंत देशातील आरोग्य परिदृश्य बदलण्याच्या दृष्टीकोनातून भारत आरोग्याबाबत समग्र दृष्टीकोनाचा अंगीकार करत असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी सांगितले.
'मेडटेक मित्र' या वैद्यकीय तंत्रज्ञान क्षेत्रातील नवप्रवर्तक आणि प्रगत आरोग्य सेवा उपाययोजनांच्या सक्षमीकरणाच्या धोरणात्मक उपक्रमाचा दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून शुभारंभ करताना केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रा. एस. पी. सिंग बघेल आणि नीती आयोगाचे आरोग्य सदस्य डॉ. व्ही. के. पॉलही यावेळी उपस्थित होते.