कोरोना व्हेरिएंट JN.1 चे ६३ अॅक्टिव्ह रूग्ण! जाणुन घ्या JN.1 किती धोकादायक?
25-Dec-2023
Total Views | 124
मुंबई : कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटने डोकं वर काढलं आहे. JN. 1 या कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटमुळे चिंता वाढली आहे. भारतात कोरोना JN.1 च्या नवीन प्रकारातील रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे. 24 डिसेंबरपर्यंत, देशात JN.1 कोविड प्रकाराची 63 प्रकरणे नोंदवली गेली आहेत. गोव्यात याचे 34 सर्वाधिक रूग्ण आढळुन आले आहेत. त्यानंतर महाराष्ट्रातून 9, कर्नाटकातील 8, केरळमधील 6, तामिळनाडूमधील 4 आणि तेलंगणातील 2 रुग्ण आढळले आहेत.
सध्या देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार हजारांच्या पुढे गेली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, रविवारी (24 डिसेंबर) कोरोनाचे 656 नवीन रुग्ण आढळले, त्यानंतर देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 4,054 झाली आहे. मात्र, यापैकी बहुतेक रुग्ण घरीच राहून बरे होत आहेत. राज्यातील करोना मृत्यूदर १.८१ टक्के आहे.
JN.1 सब-व्हेरियंट म्हणजे काय?
JN.1 हा BA.2.86 ओमिक्रॉनशी संबंधित आहे. 2022 च्या सुरुवातीला, उन्हाळ्यात अचानक कोविडमध्ये वाढ झाली होती. तज्ज्ञांच्या मते दोन्ही वेरिएंट हे एकमेकांसारखेच आहेत. ते मानवी पेशींमध्ये सहज आक्रमण करू शकतात. नवा वेरिएंट प्रतिकारशक्ती अधिक वेगाने कमी करण्यासाठी परिणामकारक ठरतो. त्यामुळे इन्फेक्शन पटकन होऊ शकते. ताप, थकवा, सर्दी, घशात खवखव, डोकेदुखी, खोकला, स्ट्रोइंटेस्टायनल समस्या ही JN.1 ची लक्षणे आहेत.