रोहित पवारांचं फेसबुक खातं हॅक!

    22-Dec-2023
Total Views |
Rohit Pawar Facebook Account Hack
 

मुंबई
: गेल्या काही दिवसापासून राष्ट्रवादीचे शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार हे युवा संघर्ष यात्रेमुळे चर्चेत होते. पण आता रोहित पवारांचे फेसबुक अकाऊंट हॅक झाल्याची माहिती उघडकीस आली आहे. रोहित पवार यांच्या फेसबुक प्रोफाईल फोटोलो सिया राजपूत हे नाव असलेले पोस्टर दिसत आहे. दरम्यान रोहित पवार समर्थकांनी खातं हॅक झाल्याचे तिथेच कमेंटमध्ये सांगितले आहे.
 
दरम्यान रोहित पवारांनी x वर आपलं फेसबुक खातं हॅक झाल्याची माहिती ही दिली आहे. रोहित पवार म्हणाले की, "गेल्या काही दिवसांपासून माझे सोशल मिडियावरील अकाऊंट हॅक होण्याचे प्रकार सुरु आहेत. आज माझं अधिकृत फेसबुक पेज हॅक झालं.या पेजवर चुकीचा मजकुर दिसून येत असून, कृपया याकडे दुर्लक्ष करावं. याबाबत रिकव्हरीसाठी प्रयत्न सुरु आहेत."