हा संपुर्ण भारताचा अपमान! मिमिक्री प्रकरणी मंत्री लोढांच्या नेतृत्वात भाजपचे आंदोलन

    21-Dec-2023
Total Views | 50

Lodha


मुंबई :
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांची नक्कल केल्याप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या नेतृत्वात मुंबईतील लालबाग परिसरात भाजपकडून गुरुवारी जोरदार आंदोलन करण्यात येत आहे. दरम्यान, उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा अपमान हा संपुर्ण भारताचा अपमान असल्याचे मंत्री लोढांनी म्हटले आहे.
 
मंत्री मंगलप्रभात लोढा म्हणाले की, "उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा विरोधकांकडून करण्यात आलेला अपमान हा त्यांचा व्यक्तीगत अपमान नसून उपराष्ट्रपती या संविधानिक पदाचा अपमान होता. भारताची प्रतिमा विलीन करण्यासाठी ते जाणूबुजून हे करत आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात आज संपुर्ण भारतात आक्रोशाची लाट आहे."
 
आम्ही काळा चौकी पोलीस स्टेशनला जाऊन राहूल गांधी आणि तृणमुल काँग्रेसच्या खासदारांविरुद्ध तक्रार दाखल करणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. तसेच त्यांच्याविरुद्घ तक्रार दाखल करुन पुन्हा कधी अशी घटना घडू नये यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे, असेही त्यांनी म्हटले आहे.
 
"त्यांचं कृत्य हे केवळ निदर्शन नसून जाणूनबुजून संविधानिक पदाचा केलेला अपमान होता. उपराष्ट्रपती जगदीप धनखड हे एक विद्वान व्यक्ती असून त्यांचा अपमान कुणीही सहन करणार नाही. हा केवळ शेतकऱ्यांचाच नाही तर संपुर्ण भारताचा अपमान आहे," असेही मंत्री लोढा म्हणाले आहेत.



अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121