'या' २१ वर्षीय तरुणाचा समावेश सेल्फ मेड उद्योजकांच्या यादीत; डीमार्टचे दमानी पहिल्या क्रमांकावर

    01-Dec-2023
Total Views | 74
 Damani
 
मुंबई : हुरुन इंडियाच्या टॉप-२०० सेल्फ-मेड उद्योजकांच्या यादीत डी-मार्टचे संस्थापक राधाकिशन दमानी यांनी पहिला क्रमांक पटकावला आहे. तर, दुसऱ्या क्रमांकावर ई-कॉमर्स कंपनी फ्लिपकार्टचे संस्थापक बिन्नी बन्सल आणि सचिन बन्सल यांनी पटकावला आहे. आयडीएफसी फर्स्ट बँक हुरुन इंडिया लिस्ट ३० नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध झाली.
 
या यादीत झोमॅटोचे संस्थापक दीपंदर गोयल आणि ड्रीम-११ चे संस्थापक भावित शेठ यांचीही नावे समाविष्ट आहेत. सहस्राब्दीमध्ये स्थापन झालेल्या टॉप-१० सर्वात मौल्यवान कंपन्यांपैकी ८ स्टार्टअप्स आहेत. या यादीत २०० कंपन्यांच्या ४०५ संस्थापकांचा समावेश आहे.
 
हुरुन इंडियाच्या या यादीत दमानी यांच्यासारख्या वरिष्ठ उद्योजकासोबतच कैवल्य वोहरा यांच्यासारखे तरुण उद्योजकांचा सुद्धा समावेश आहे. झेप्टोचे संस्थापक असलेले कैवल्य वोहरा हे अवघ्या २१ वर्षाचे आहेत. भारताच्या मिलेनियम २०२३ च्या टॉप-२०० सेल्फ-मेड उद्योजकांमध्ये ते सर्वात तरुण उद्योजक आहेत. त्यांच्या नंतर भारतपे चे २५ वर्षीय शाश्वत नाक्राणी आहेत.
 
मिलेनियम-२०२३ च्या टॉप-२०० सेल्फ-मेड उद्योजकांच्या यादीत २० महिला उद्योजकांचा समावेश आहे. यामध्ये मेकअप आणि फॅशन ब्रँड नायकाच्या संस्थापक फाल्गुनी नायर पहिल्या क्रमांकावर आहेत. तर ममाअर्थच्या ३५ वर्षीय गझल अलघ दुसऱ्या क्रमांकावर आहेत.
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121