नवी दिल्ली : अॅपलमध्ये काम करणाऱ्या नताशा डच नावाच्या महिलेला इस्त्रायल -हमास संघर्षावर पोस्ट करणे महागात पडले आहे. तिने यहुदींच्या विरोधात विधान केले होते. त्यामुळे तिला नोकरीवरून काढण्यात आले आहे. नताशाच्या व्हायरल झालेल्या पोस्टमध्ये तिने जर्मन आणि यहुदींना दहशतवादी म्हणटले होते. त्यानंतर नताशाविरोधात कारवाईची मागणी सोशल मिडीयावर करण्यात आली होती. दरम्यान इस्त्रायल आणि हमास यांच्यात १ महिन्यांपासून युद्ध सुरु आहे.
त्यामुळे अॅपलमध्ये काम करणाऱ्या आणि सोशल मिडियावर वेगवेगळ्या विषयांवर प्रतिक्रिया देणाऱ्या कर्मचाऱ्यांना अनेकदा कारवाईला सामोरे जावे लागते. गेल्या 3 दिवसांपूर्वी नताशाच्या सेमिटिक विरोधी पोस्टशी संबंधित एक मुद्दा समोर आला होता, ज्यानंतर सोशल मीडियावर चर्चा तीव्र झाली होती. यानंतर रविवारी अॅपल कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यावर कारवाई करत त्यांना नोकरीवरून काढून टाकले.
तीन दिवसांपूर्वी नताशाने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर स्वत:ला गर्विष्ठ जर्मन म्हणवून एक वादग्रस्त पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये नताशाने यहुदींवर टिका करत अपमानास्पद शब्दांचा वापर केला होता. त्याच्या पोस्टमध्ये त्यांनी यहुदींना खुनी आणि चोर, दहशतवादी अशा अपमानास्पद शब्दांनी संबोधित केले.