मुंबई : मंत्री संदीपान भुमरे यांनी सरकारचा जीआर मनोज जरांगेंकडे सुपूर्द केला आहे. मंत्री अतुल सावे, संदीपान भुमरे यांनी जरांगेंची भेट घेतली. तारखेपेक्षा काम कसं पटकन होईल हे महत्त्वाचं. मराठा समाजाला न्याय देण्यावर आमचा भर आहे. सरकारच्या कामाला गती आली आहे. २४ डिसेंबर आणि २ जानेवारीत फार फरक नाही. तारखेच्या आतही निर्णय होऊ शकतो. असं भुमरे यांनी यावेळी बोलताना सांगितले.
मनोज जरांगे यांनी सरकारच्या जीआरचं वाचन केलं. सरकारच्या नवीन जीआरमध्ये सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र दिले जाणार का? याचा स्पष्ट उल्लेख आहे की नाही, याबाबत माहिती नाही. संदीपान भुमरे यांनी जरांगे पाटील यांच्याशी संवाद साधला. शासनाने तीन नोव्हेंबर रोजी काढलेला जीआर सोपवला. मात्र, या जीआरनुसार केवळ पात्र मराठा समाजाला ओबीसीमधून प्रमाणपत्र देणार आहे, अशी माहिती मिळत आहे. त्यामुळे जरांगे यांच्या मागणीनुसार सरसकट मराठा समाजाला कुणबी दाखले देण्याच्या मागणीबाबत अजून काही स्पष्टता दिसत नाही.