केंद्र सरकारची सर्वसामान्यांना मोठी भेट! एलपीजी सिलिंडरवर मिळणार 300 रुपये सबसिडी
04-Oct-2023
Total Views | 51
मुंबई : केंद्र सरकारने उज्ज्वला योजनेंतर्गत १४.२ किलो एलपीजी सिलिंडरवरील सबसिडी २०० रुपयांवरून ३०० रुपयांपर्यंत वाढवण्याची घोषणा केली. केंद्र सरकारच्या या निर्णयाने सर्वसामान्य जनतेला मोठा दिलासा मिळाला आहे. याआधी १४.२ किलो एलपीजी सिलिंडरचे भाव ७०८ रुपये इतका होता. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे आता एलपीजी सिलिंडर ६०८ रुपयाला मिळेल.
ऑगस्टमध्ये रक्षाबंधनाच्या आधी सरकारने एलपीजी सिलिंडरच्या किमती 200 रुपयांनी कमी केल्या होत्या. त्यानंतर आता पुन्हा केंद्र सरकारने सर्वसामान्य जनतेला दिलासा देणारा निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने २०१६ मध्ये गरीब कुटुंबातील महिलांसाठी मोफत गॅस सिलिंडर आमि शेगडी देण्यासाठी उज्ज्वला योजना आणली होती. या योजनेंतर्गत केंद्र सरकारने आतापर्यंत जवळपास १० कोटी कनेक्शन मोफत दिले आहेत.