मुंबई : सध्या हिंदी आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील कलाकार एकमेकांच्या चित्रपटांमध्ये उल्लेखनीय भूमिका करताना दिसत आहेत. हिंदी चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील अभिनयाचे देव म्हणजे रजनीकांत तब्बल ३३ वर्षांनंतर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. ‘थलाईवर १७१’ या चित्रपटात हे दोघे एकत्र काम करणार असल्याची आनंदाची बातमी स्वत: रजनीकांत यांनी ट्विट करत दिली आहे.
रजनीकांत यांनी अमिताभ बच्चन यांच्यासोबत एक फोटो पोस्ट करत म्हटले आहे की, “पुन्हा एकदा मी माझ्या मार्गदर्शकासोबl तब्बल ३३ वर्षांनी काम करणार आहे, त्याचा मला अत्यानंद होत आहे”.
दरम्यान, ‘थलाईवर १७१’ या चित्रपटाचे दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल असून त्यांचा हा चित्रपट एका सत्य घटनेवर आधारित आहे. यात रजनीकांत पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साकारणार आहेत.
अमिताभ आणि रजनीकांत यांनी यापुर्वी ‘हम तुम’, ‘गिरफ्तार’ आणि ‘अंधा कानून’सारख्या गाजलेल्या चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. दिग्दर्शक टीजे ज्ञानवेल यांच्या ‘थलाईवर १७०’ या चित्रपटात रजनीकांतसह अमिताभ बच्चन राणा डग्गूबाती, फहाद फाजील महत्वपूर्ण भूमिका साकारणार असून पुन्हा एकदा संगीतकार अनिरुद्धचे संगीत चित्रपटाला लाभणार आहे