मुंबई : राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्था अंतर्गत विविध रिक्त पदांच्या जागांसाठी भरती केली जाणार आहे. या भरतीसंदर्भात राष्ट्रीय क्षयरोग संशोधन संस्थेकडून अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीच्या माध्यमातून आयसीएमआर अंतर्गत असणाऱ्या एनआयआरटीमधील विविध रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. भरतीसंदर्भात अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.
या भरतीअंतर्गत तांत्रिक सहाय्यक, प्रयोगशाळा अटेंडंट या पदांच्या एकूण ७६ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत. या भरतीकरिता इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. तसेच, या रिक्त पदांसाठी अर्जदाराने अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा असून अर्ज करण्याची शेवटची तारीख ८ नोव्हेंबर २०२३ असणार आहे.