मुंबई : 'मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड'अंतर्गत भरती केली जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेडमधील रिक्त जागांसाठी अधिसूचना जारी करण्यात आली आहे. एमआरव्हीसीमधील 'सहाय्यक व्यवस्थापक' पदाच्या एकूण १५ जागा भरल्या जाणार आहेत.
या भरतीकरिता उमेदवारांसाठी शैक्षणिक पात्रता निश्चित करण्यात आली असून अर्जदाराने सिव्हिल इंजिनियरींग केलेले असावे. तसेच, कंस्ट्रक्शन साईटवर ६ वर्षांचा अनुभव असणे आवश्यक आहे. तर उमेदवाराचे वय ६० वर्ष असावे तर नियुक्त उमेदवारास नोकरीचे ठिकाण मुंबई असणार आहे.
या भरतीकरिता अर्जदारास अर्ज हा ई-मेल द्वारे पाठवायचा असून -career@mrvc.gov.in हा आहे. तसेच, भरतीविषयक अधिक तपशील जाणून घेण्यासाठी
अधिकृत वेबसाईटला भेट द्या.