मुंबई : दक्षिण आफ्रिका आणि इंग्लंड यांच्यातील विश्वचषकाचा सामना मुंबईच्या वानखेडेवर खेळविण्यात येत आहे. इंग्लंडने नाणेफेक जिंकत सर्वप्रथम गोलंदाजीचा निर्णय घेत आफ्रिकेला फलंदाजीस आमंत्रित केले. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना
क्लासेन याने शतकी खेळी केली. ६७ चेंडूत १०९ धावा केल्या. या खेळीवर दक्षिण आफ्रिकेने ४०० धावांचा विशाल डोंगर उभा केला.
इंग्लंडकडून गोलंदाजी करताना रीस टोपले याने सर्वाधिक तीन विकेट्स घेतल्या तर अटकिन्सन, फिरकीपटू आदिल रशीदने प्रत्येकी १-१ विकेट घेतली. दक्षिण आफ्रिकेने याआधी ४२८ धावा केल्या होत्या. त्यानंतर आता इंग्लंडसमोर विजयासाठी ४०० धावांचे लक्ष्य आफ्रिकेने दिले आहे.