डाव्यांच्या अतिरेकी कारवायांविरोधात NIA ची धडक कारवाई
02-Oct-2023
Total Views | 295
मुंबई : राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने आज (०२/१०/२०२३) आंध्र प्रदेश आणि तेलंगणामध्ये छापेमारी केली. डाव्या विाचरसरणीच्या देशविरोधी कारवायांना आळा घालण्यासाठी राष्ट्रीय तपास यंत्रणा (एनआयए) ने या दोन राज्यांमध्ये छापे टाकले. एएनआय या वृत्तसंस्थेनुसार, दोन राज्यांमध्ये 60 हून अधिक ठिकाणी एनआयएने शोध घेतला.
यापूर्वी, एनआयएने जम्मू-काश्मीरमधील धनगरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यासंदर्भात पुंछमधील चार ठिकाणी छापे टाकले होते. या काळात आक्षेपार्ह डेटा, अनेक डिजिटल उपकरणे आणि कागदपत्रे जप्त करण्यात आली होती. त्याचबरोबर एनआयएने खलिस्तानी दहशतवाद्यांविरोधात सुद्धा धडक कारवाई सुरु केली आहे.