ललित पाटील प्रकरणात फडणवीसांची मोठी प्रतिक्रिया! म्हणाले,"लवकरच सर्वच धागेदोरे..."

    18-Oct-2023
Total Views | 58

Devendra Fadanvis


मुंबई :
ड्रग्ज माफिया ललित पाटील याला अटक करण्यात मुंबई पोलिसांना यश आले असून त्याला सोमवारपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाी प्रतिक्रिया दिली आहे. लवकरच ललित पाटील प्रकरणी सर्वच धागेदोरेबाहेर येणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, ड्रग्ज फ्री महाराष्ट्र ही संकल्पना घेऊन मागची जी क्राईम कंट्रोल कॉन्फरन्स होती त्यामध्ये सगळ्या युनिट्सला आम्ही सांगितलं होतं की, मोठ्या प्रमाणात ड्रग्जचा पर्दाफाश केला पाहिजे. त्यामाध्यमातून सगळे युनिट्स कामाला लागलेले आहेत, असे ते म्हणाले.
 
याचदरम्यान, मुंबई पोलिसांनादेखील नाशिकमधील ड्रग्ज कारखान्याची माहिती मिळाली आणि त्यांनी तिथे धाड टाकली. यासोबतच वेगवेगळ्या ठिकाणी असे काम करणाऱ्या ठिकांणांवर धाडी टाकल्या आहेत. आता ललित पाटील हातामध्ये आलेला आहे. निश्चिचपणे त्यातून एक मोठं नेक्सस बाहेर येईल, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.
 
तसेच या कारवाईतून आम्ही एक मोठे ड्रग्जचे जाळे उघड करू. लवकरच सर्व धागेदोरे बाहेर निघणार असून त्यातून सगळ्यांची तोंडं बंद होणार असल्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत. दरम्यान, मुंबई पोलिसांनी बंगरुळूमधून ललित पाटीलला ताब्यात घेतले आहे.


अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121