दत्तोपंत ठेंगडी यांच्या स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथे कामगार मेळावा

    15-Oct-2023
Total Views | 32
Nanded Kamgar Melava
 
पुणे : भारतीय मजदूर संघ संस्थापक श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचा १४ आक्टोबर स्मृतिदिनानिमित्त नांदेड येथे समरसता दिनाच्या निमित्ताने कामगार मेळावा संपन्न झाला. नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी निलावर, सेक्रेटरी अनुप जोंधळे, बांधकाम कामगार संघांचे सरचिटणीस संजय सुरवसे, व प्रमुख वक्ते म्हणून सचिन मेंगाळे सरचिटणीस महाराष्ट्र विज कंत्राटी कामगार संघ (संलग्न भारतीय मजदूर संघ) प्रमुख वक्ते म्हणून होते. या वेळी श्रध्देय दत्तोपंत ठेंगडी यांचा विचारांवर कामगार संघटनेनी वाटचाल करून समाजाचे नेतृत्व करण्याची आवश्यकता आहे . समाजीत शेवटच्या घटका पर्यंत, शोषित पिडीत वंचित कामगारांना, न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत राहुन प्रयत्न करण्याचे आवाहन प्रमुख वक्ते म्हणून सचिन मेंगाळे यांनी केले आहे.
 
भारतीय मजदूर संघाचे देश हीत, ऊद्योगा हीत, कामगार हीत, व ग्राहक हित, असेच सुत्र मांडून कामगार चळवळ , संघटना राजकारणा पासून अलिप्त असली पाहिजे असाच विचार मांडला आहे त्यानुसार भारतीय मजदूर संघ हा देशभरातील शोषित पिडीत वंचित कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी देशभरात कार्यरत आहे . तरी भारतीय मजदूर संघात कामगारांनी एकजुटीने सहभागी होऊन अन्याय च्या विरोधात आवाज उठवावा असे आवहान सचिन मेंगाळे यांनी केलेले आहे.
 
दत्तोपंत ठेंगडी हे भारतीय मजदूर संघाचे तसेच भारतीय किसान संघ, सामाजिक समरसता मंच, सर्व पंथ समादर मंच, स्वदेशी जागरण मंच, पर्यावरण मंच या संस्थांचे संस्थापक होते. या माध्यमातून समाजातील विविध घटकांसाठी कार्यकर्ते घडवून समाजातील घटकांसाठी महत्वपूर्ण योगदान देत आहेत. त्यांनी ३५ हिंदी पुस्तके, १० इंग्रजी पुस्तके, ४ मराठी पुस्तके लिहिली आहेत ती मार्गदर्शकच आहेत. दत्तोपंत ठेंगडी यांचा १४ आक्टोबर स्मृतिदिनानिमित्त भारतीय मजदूर संघाच्या माध्यमातून विविध ठिकाणी कामगार मेळावा, रक्तदान शिबिर, आरोग्य तपासणी शिबिर विविध जिल्हां मध्ये आयोजित केले होते.
 
नांदेड येथे समरसता दिनाच्या निमित्ताने झालेल्या मेळावा मध्ये अध्यक्षस्थानी भारतीय मजदूर संघ नांदेड जिल्हा अध्यक्ष बालाजी निलावर होते, मंचावर जिल्हा सचिव अनुप जोंधळे यांनी प्रास्ताविक केले बांधकाम कामगार संघांचे सरचिटणीस संजय सुरवसे यांनी श्रमीक गीत, परिचय करून दिला, मेळावाचे आभार प्रदर्शन गजानन तोकलवार यांनी केले आहे. या वेळी प्रमुख कार्यकर्ते निलेश गादगे, गजानन कुंतुरकर, गंगाधर शेमदाडे आदी पदाधिकारी यांनी महत्वपूर्ण योगदान दिले आहे.
 
या वेळी नांदेड मधील विद्युत विभाग, बॅंक ऊद्योग , बांधकाम कामगार, घरेलु कामगार, सहकारी बॅंक ऊद्योग , तसेच वीज ऊद्योगातील कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते.
 
अग्रलेख
जरुर वाचा
पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे शहराची नवीन क्षेत्रात पदार्पण करून सामर्थ्य निर्माण करण्याची क्षमता – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत दि. १ ऑगस्ट रोजी 'पुणे मेट्रोपॉलिटन रिजन ग्रोथ हब' चा शुभारंभ यशदा येथे करण्यात आला. या कार्यक्रमात बोलत असताना फडणवीस म्हणाले, कोणत्याही एका शहराने एखाद्या क्षेत्रावर वर्चस्व गाजविण्यासारखी स्थिती आता राहिली नसून महाराष्ट्रातील अनेक शहरे गतीने विकास करत आहेत. मात्र,पुणे शहर प्रचंड प्रगतशील आणि नाविन्यतेचे केंद्र असून नवीन क्षेत्रात पदार्पण करून आपले सामर्थ्य निर्माण करण्याची या शहरात क्षमता आहे. भविष्यात पुणे निश्चितच भरारी घेईल आणि त्यासाठी ग्रोथ हबच्या माध्यम..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121