मुंबई : शिवराज अष्टकातून लोकांपर्यंत शिवरायांचा इतिहास पोहोचवणारे दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर पुन्हा एकदा इतिहासातील महत्वाचे पान उलगडणार आहेत. शिवरायांचा छावा हा चित्रपट धर्मवीर संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित असून या चित्रपटाने प्रदर्शनापुर्वीच मराठी चित्रपटसृष्टीत एक इतिहास रचला आहे. ‘शिवरायांचा छावा’ या मराठी चित्रपटाचे मोशन पोस्टर न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित टाईम्स स्क्वेअरवर झळकले आहे. त्यामुळे हा चित्रपट टाइम्स स्क्वेअरवर मोशन पोस्टर प्रदर्शित करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला आहे.
‘शिवरायांचा छावा’ या चित्रपटाची निर्मिती वैभव भोर आणि किशोर पाटकर, सहयोगी निर्माता भावेश रजनीकांत पंचमतिया आणि कार्यकारी निर्माता प्रखर मोदी यांनी केली असून मल्हार पिक्चर कंपनीच्या प्रस्तुत ‘शिवरायांचा छावा’ हा चित्रपट दिग्पाल लांजेकर यांनी दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट १६ फेब्रुवारी २०२४ ला प्रदर्शित होणार आहे.