मुंबई : भारत विरुध्द अफगाणिस्तान यांच्यात आज दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर लढत होणार आहे. भारताकडून या सामन्यासाठी कसून सराव करण्यात येत आहे. तसेच, टीम मॅनेजमेंटकडून रणनीती ठरविण्यात येत आहे. अंतिम ११ खेळाडूंमध्ये कुणाला स्थान द्यावे, याविषयी फार उत्सुकता असेल. शुभमन गिलच्या जागी इशान किशन खेळणार का, किंवा रोहित शर्माला नेट प्रॅक्टिसवेळी झालेली दुखापत त्यामुळे रोहित आजचा सामना खेळणार का, असे प्रश्न सध्या उपस्थित झाले आहे.
याचं उत्तर सामना सुरु होण्याआधी मिळेल, तसेच, दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियमवर होणाऱ्या सामन्यातील खेळपट्टी ही प्रामुख्याने फलंदाजीसाठी अनुकूल असणार आहे. भारताचा याआधीचा रेकॉर्ड पाहता, भारतीय फलंदाज सुर्यकुमार यादव आणि विराट कोहली यांच्याकडून भारताला आज अपेक्षा असणार आहेत. मैदानाचा आवाका पाहता, फिरकीपटूंपेक्षा जलद गोलंदाजीवर जास्त भर दिला जाण्याची शक्यता आहे.
एकंदरीत भारताचा प्रमुख फिरकीपटू आर. आश्विनला संघात स्थान मिळणार का, की आणखी एक जलदगती गोलंदाज विशेषतः (शार्दुल ठाकूर) भारत खेळविणार हे पाहणे औत्सुक्याचे असेल. आश्विनच्या स्थानाविषयी बोलायचे तर दिल्लीतील खेळपट्ट कदाचित चेन्नईसारखी फिरकीपटूंसाठी अनुकूल नसेल. त्यामुळे त्याचे संघातले स्थान कायम राहणार का, हे पाहावे लागेल.