"उद्धव ठाकरेंनीा पक्ष पवार सोनियांच्या दावणीला बांधला!"
"माझ्या मुलाला संपवण्याचा प्रयत्न होतोयं!" : रामदास कदम
07-Jan-2023
Total Views | 76
32
रत्नागिरी : "उद्धव ठाकरे यांनी आपला शिवसेना पक्ष शरद पवार आणि सोनिया गांधी यांच्या दावणीला बांधला, अशी टीका माजी आमदार आणि शिवसेना नेते रामदास कदम यांनी केली आहे. रत्नागिरीतील खेड तालुक्यात जामगे या गावातील आपल्या निवासस्थानी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यांचे पुत्र योगेश कदम आमदार असताना अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पराभूत उमेदवाराला निधी पुरवला, असा आरोपही त्यांनी केला.
"आम्हाला राजकारणातून संपवण्याचा कट अनिल परब यांनीच रचला होता. शिवसेनेच्या फुटीलाही अनिल परब जबाबदार आहेत. त्यांची ईडीकडून चौकशी व्हायलाच हवी, अशी मागणीही त्यांनी केली. तसेच अनिल परब यांची जागा तुरुंगातच आहे, असा घणाघात रामदास कदम यांनी केला आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात माझा मुलगा दापोलीत शिवसेनेचा विद्यमान आमदार असतानाही अनिल परब यांनी राष्ट्रवादीच्या पडलेल्या माजी आमदाराला निधी देऊन शिवसेना आमदार योगेश कदम यांना राजकारणातून संपवण्याचा डाव खेळला होता, असेही कदम म्हणाले.
अनिल परब हा उद्धव ठाकरेंचा चमचा!
"अनिल परब हा उद्धव ठाकरेंचा चमचा आहे.", अशा शेलक्या भाषेत त्यांनी टीका केली. शिवसेना पक्षामध्ये फुट पडण्याला कारणीभूत ठरणारे अनिल परब यांची जागा तुरुंगातच आहे, असे बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे नेते रामदास कदम यांनी केले आहे.