राऊतांकडून मातोश्रीला 'सुरुंग' लावण्याचा प्रयत्न; राणेंचा मोठा गौप्यस्फोट

    07-Jan-2023
Total Views |

राऊतांकडून मातोश्रीला 'सुरुंग' लावण्याचा प्रयत्न; राणेंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई : केंद्रीय मंत्री नारायण राणे आणि उद्धव सेनेचे खा. संजय राऊत यांच्यात सध्या जोरदार खडाजंगी सुरु आहेत. संजय राऊतांनी केलेल्या आरोपांवर राणेंनी शनिवारी माध्यमांशी बोलताना चांगलाच पलटवार केला आहे. 'शिवसेना संपवायची सुपारी संजय राऊतांनी घेतली आहे. त्यांनी सांगितलेल्या अशा काही गोष्टी आहेत ज्या मी लवकरच उद्धव ठाकरेंना सांगणार आहे. त्या त्यांना कळल्या तर ठाकरे आणि रश्मीताई त्यांना चपलेने मारतील. राऊत मातोश्रीला 'सुरुंग' लावण्याचा प्रयत्नात आहेत', असा गौप्यस्फोट राणेंनी केला आहे.
संजय राऊतांनी पत्रकारांशी बोलताना राणेंवर गंभीर आरोप केले होते. त्यावर प्रत्युत्तर करत नारायण राणेंनी संजय राऊतांना खुलं आव्हान दिलं आहे. ते म्हणाले, 'शिवसेना संपवायची सुपारी मी नव्हे तर संजय राऊतांनी घेतलीये. आता शिवसेनेत कोणीही उरलेले नाहीत. याचाच आनंद त्यांना होतोय आहे. त्यांनीच शिवसेना संपवली. त्याने सामाजिक, आर्थिक, धार्मिक असे कोणतेच काम केलेले नाही. ते काय आव्हान देतायत, मीच त्यांचा खुलं आव्हान देतो; तुम्ही बोलवाल तिथे मी माझी सुरक्षा बाजूला ठेऊन यायला तयार आहे!"
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.