मुंबई : कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर बुधवारी 4 जानेवारी रोजी पश्चिम बंगालमध्ये कोरोना व्हायरसच्या ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 च्या चार रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. हे सर्वजण अमेरिकेतून आल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. नुकतंच अमेरिकेतून परतलेल्या चार लोकांच्या जीनोम सिक्वेन्सिंगमुळे त्यांना कोरोना व्हायरसची लागण झाल्याची माहिती आरोग्य विभागानं दिली आहे. या सर्वांना ओमायक्रॉनचा सब-व्हेरियंट BF.7 (Omicron Sub Variant BF.7) ची लागण झाली असल्याचंही आरोग्य विभागानं सांगितलं आहे.
चारही रुग्णांची प्रकृती स्थिर असल्याचं आरोग्य विभागानं सांगितलं आहे. चार जणांपैकी तीघ नादिया जिल्ह्यातील आहेत, तर एक बिहारचा रहिवाशी आहे, परंतु सध्या तो कोलकात्यात राहतो. विमानतळावर स्क्रिनिंग आणि कोरोना चाचण्या केल्या जात आहेत. WHO ने नव्या वर्षात कोरोनाच्या धोक्याबाबत इशारा दिला आहे. ग्लोबल प्रेस कॉन्फरन्समध्ये डब्ल्यूएचओ तज्ञ म्हणाले की, एक नवी लाट येऊ शकते, आता XBB.1.5 प्रकार देखील वेगानं पसरत आहे. प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना करण्यासाठी कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूच्या घटनांमध्ये वाढ झालीच पाहिजे असं नाही. त्यांनी चीननं दिलेला डेटा अपुरा असल्याचं पुन्हा एकदा स्पष्ट केलं.