नागरी प्रश्नाची जाण असलेला लोकप्रतिनिधी गमावला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

    03-Jan-2023
Total Views |


नागरी प्रश्नाची जाण असलेला लोकप्रतिनिधी गमावला: उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुंबई : राजकारण आणि समाजकारणात ठाम भूमिका घेणारा नेता आपल्यातून निघून गेला, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे. आमदार लक्ष्मण जगताप गेल्या अनेक महिन्यांपासून दुर्धर आजाराने त्रस्त होते. पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू असतानाच लक्ष्मण जगताप यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
 
उपमुख्यमंत्री फडणवीस आपल्या शोकसंदेशात म्हणतात, "पिंपरी-चिंचवडचे भाजप आमदार लक्ष्मण जगताप यांच्या निधनाने एक समाजाभिमुख, नागरी प्रश्नाची जाण आणि त्याची उकल माहिती असलेला लोकप्रतिनिधी आपण गमावला आहे. त्यांच्या निधनाने केवळ भारतीय जनता पक्षाचेच नाही तर माझेही वैयक्तिक नुकसान झाले आहे, मी एक चांगला मित्र गमावला आहे. एका दीर्घ आजाराशी ते सातत्यानं संघर्ष करत होते. त्यातून ते बाहेर आले, असं आम्हाला वाटतं असताना पुन्हा त्यांना रुग्णालयात दाखल करावं लागलं. आज ते आमच्यातून निघून गेले. आम्हाला पुण्यात जिल्ह्यातून दुसरा धक्का आहे."
 
 
"मागच्या काळात राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीत अत्यवस्थ परिस्थितीत, रुग्णवाहिकेत कीट घालून ते पोहोचले. ही पक्षा करिता त्यांची निष्ठा होती. प्रचंड मोठा जनसंपर्क त्यांचा होता. सर्वसामान्य माणसांशी नातं होतं. विकासाची दृष्टी त्यांच्याकडे होती. त्यामुळे पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रात आज वेगवेगळ्या स्वरूपाचे प्रोजेक्ट आपण बघतोय, त्याचं कारण लक्ष्मण जगताप यांची दृष्टी आहे. दूरदृष्टी असलेला नेता आमच्यातून निघून केला. आमच्यासाठी ही खूप मोठी हानी आहे. माझ्या प्रार्थना त्यांच्या परिवारासोबत आहे. मी त्यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण करतो."अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष्मण जगताप यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.