डावे आणि काँग्रेसप्रणित भारतविरोधी ‘टूलकिट’ पुन्हा सक्रीय

दिल्ली विद्यापीठ, जादवपूर विद्यापीठ आणि एफटीआयआयमध्ये खोट्या माहितीपटाचे प्रदर्शन

    27-Jan-2023
Total Views | 104
BBC releases anti-India documentary


नवी दिल्ली
: बीबीसी या ब्रिटीश माध्यमसमुहाचा भारतविरोधी माहितीपट प्रदर्शित करण्याच्या नावाखाली देशातील विविध शिक्षण संस्थांमध्ये अस्तित्वात असलेल्या भारतविरोधी टूलकिटने पुन्हा एकदा उचल खाल्ली असल्याचे स्पष्ट झाले आहे.


बीबीसी या ब्रिटनस्थित माध्यमसमुहाने इंडिया – द मोदी क्वेश्चन नावाचा माहितीपट तयार केला आहे. त्यामध्ये गुजरात दंगलीस पंतप्रधान नरेंद्र मोदी जबाबदार असल्याचे खोटे दावे करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे या माहितीपटाविषयी ब्रिटीश पंतप्रधान ऋषी सुनक यांनी त्यांच्या संसदेती जाहिर नाराजीही व्यक्त केली आहे. मात्र, भारतात डाव्या विचारांच्या आणि काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनांनी या खोट्या माहितीपटास तो केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करत असल्याचे उचलून धरले आहे.

देशाची राजधानी दिल्ली येथील दिल्ली विद्यापीठामध्ये एनएसयुआय या विद्यार्थी संघटनेने शुक्रवारी बीबीसीचा खोटा माहितीपट प्रसारित करण्याचा प्रयत्न केला असता जोरदार राडा झाला. यावेळी एनएसयुआयच्या सदस्यांनी आंदोलन करण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी दिल्ली पोलिसांना परिसरात कलम १४४ लागू करावे लागले आणि राडेबाज विद्यार्थ्यांवा ताब्यात घ्यावे लागले. त्याविषयी बोलताना उत्तर दिल्लीच्या अतिरिक्त पोलिस उपायुक्त रश्मी शर्मा म्हणाल्या की, सार्वजनिक व्यवस्था आणि शांततेस भंग करण्याचा प्रयत्न झाल्यास त्याविरोधात पोलिसांना कारवाई करावी लागते. त्यानुसार दिल्ली पोलिसांनी कारवाई केल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्याचप्रमाणे विनापरवानगी माहितीपट प्रदर्शित केल्याप्रकरणी विद्यापीठाच्या प्रॉक्टर रजनी अब्बी यांनी पोलिस तक्रार केली आहे.


दिल्लीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठामध्येही डाव्या विद्यार्थी संघटनांनी विनापरवाना माहितीपट मोठ्या पडड्यावर प्रदर्शित करण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्याचप्रमाणे हिंदू कॉलेजमध्ये स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया (एसएफआय) या डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनेने महाविद्यालय प्रशासनान परवानगी नाकारल्यानंतर परिसराबाहेर माहितीपट प्रदर्शित केला. त्याचप्रमाणे पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठ आणि पुण्यातील फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडियामध्येही (एफटीआयआय) या खोट्या माहितीपटाचे प्रदर्शन करण्यात आले आहे.


माहितीपटास जगभरातून विरोध होऊ लागताच बीबीसीनेदेखील हा माहितीपट काढून घेतला आहे. त्याचप्रमाणे भारतातदेखील हा खोटा माहितीपट युट्यूब आणि ट्विटरवरून पाहता येणार नाही, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, देशातील विविध विद्यापीठांमधील डावे पक्ष आणि काँग्रेसप्रणित विद्यार्थी संघटनांनी हा माहितीपट बेकायदेशीरपणे प्रसारित करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यास प्रारंभ केला तो अभ्यासक्रमबाह्य राजकीय अजेंडा रेटण्यास प्रसिद्ध असलेल्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) डाव्या विचारांच्या विद्यार्थी संघटनांनी.

‘अल्ला हू अकबर’वाला वहिदुज्जमान निलंबित

अलिगढ मुस्लिम विद्यापीठाने (एएमयू) प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्यानंतर ‘अल्लाह हु अकबर’ अशा एका विद्यार्थ्याला निलंबित केले आहे. वहीदुज्जमान असे निलंबित विद्यार्थ्याचे नाव आहे. तो मालदा जिल्ह्यातील बोमपाल गावचा रहिवासी आहे. तो एमयूमध्ये बी.ए प्रथम वर्षाचा विद्यार्थी आहे. ‘अल्लाह हु अकबर’च्या घोषणा दिल्याच्या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठ प्रशासनाने तीन सदस्यीय समिती स्थापन केली आहे.











अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121