डांबरीकरणाच्या नावाखाली काळं पाढरं करणाऱ्यांची दुकानं बंद होतील : एकनाथ शिंदे

    21-Jan-2023
Total Views |

एकनाथ शिंदे
मोदींच्या भाषणावेळीच शिंदेंनी ठाकरेंना सुनावलं! म्हणाले...
मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील काही प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. या सभेसाठी भाजपसह शिंदे गटाने देखील जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी दुपारी पाच वाजता मुंबई दाखल झाले आणि सव्वा पाचच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाषण करताना मविआ सरकारला टोले लगावले.
 
 
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं मुंबई नगरीच्यावतीने स्वागत करतो आणि त्यांना मनापासून धन्यवाद देतो. महाविकास आघाडी सरकारच्या काळात महाराष्ट्राचा विकास किती झाला ते आपल्याला माहित आहे. ठप्प झालेल्या कामांना चालना देण्यासाठी आणि जो लोकापयोगी योजनांचा श्वास गुदमरला होता, त्यातून मुंबईकरांची जनतेची सुटका करण्याची संधी आम्हाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे मिळाली."
 
 
"मुंबईकरांचं जगणं सुसह्य करण्याची सुरुवात आज झाली आहे. येत्या दोन अडीच वर्षात मुंबईचा कायापालट आपल्याला पाहिला मिळेल. आजच्या दिवसात सुरुवात सुवर्ण अक्षरात नोंद करावी अशी आहे. 2015 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना पीएम मोदींच्या हस्ते या मेट्रो योजनेचं भूमिपूजन झालं होतं आणि आज त्यांच्याच हस्ते या योजनेचं लोकार्पण होतंय, हो मोठा दैवी योग असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हणटल आहे."
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.