"मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी स्वतः ची घरं भरली !" : देवेंद्र फडणवीस

    21-Jan-2023
Total Views |



"मुंबई महापालिकेवर राज्य करणाऱ्यांनी स्वतः ची घरं भरली !" : देवेंद्र फडणवीस

मुंबई : आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मुंबईतील काही प्रकल्पांचे लोकार्पण होणार आहे. या सभेसाठी भाजपसह शिंदे गटाने देखील जय्यत तयारी केली आहे. दरम्यान, . या कार्यक्रमासाठी नरेंद्र मोदी दुपारी पाच वाजता मुंबई दाखल झाले आणि सव्वा पाचच्या सुमारास कार्यक्रमाला सुरुवात झाली. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाषणाच्या सुरुवातीलाच शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधत आपली उद्विग्नता बोलून दाखवली.

दरम्यान, भाषणाच्या सुरुवातीला उपमुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं स्वागत करतो. सर्व नागरिकांचं स्वागत करतो. महाराष्ट्र आणि मुंबईच्या वतीने मी पंतप्रधान मोदींचं स्वागत केलं. नरेंद्र मोदी यांना सर्वाधिक प्रेम मुंबईकरांनी दिलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीजी, तुम्ही 2019 मध्ये सांगितलं होतं की पाच वर्षाच्या डबल इंजिन सरकार आणा. आपल्यावर विश्वास ठेवून देशातील नागरिकांनी डबल इंजिनचं सरकार आणलं. पण काही लोकांनी बेईमानी केली. त्यामुळे अडीच वर्ष जनतेच्या मनाचं सरकार नाही बनू शकलं. पण बाळासाहेब ठाकरे यांचे खरे अनुयायी एकनाथ शिंदे यांनी धाडस केलं आणि आपल्या आशीर्वादाने पुन्हा एकदा महाराष्ट्रात जनतेच्या मनातलं सरकार इथे तयार झालं."


"आता महाराष्ट्राचा विकास जोरदार होतोय. राजकारण कसे असते? कोविड काळात पंतप्रधानांनी सर्वांचा विचार करत स्वनिधीची रचना केली. मात्र, महाराष्ट्र सरकारच्या तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेत हा निर्णय राज्यात लागू करायचा नाही, असा निर्णय घेतला. तेव्हा आम्ही एक बैठक घेतली. एक लाख फूटपाथ दुकानादार, फेरीवाल्यांना निधी देण्याचा निर्णय घेतला. आता तो आकडा सव्वालाखावर गेले आहे. मला या गोष्टीचा खूप आनंद आहे. तुम्ही ज्या-ज्या योजनांची घोषणा केली. त्याच्या उदघाटनालाही पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहतात. हे नवे कल्चर तुम्ही आणले." असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी मोदींचे आभार मानले.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Instagram वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.