श्रीनगर : जम्मू काश्मीर राज्यात बस अपघातांचे सत्र थांबतच नाहीये. ३१ ऑगस्टला वैष्णोदेवीला जाणाऱ्या भाविकांच्या बसला झालेल्या अपघातात रक्त चिमुरड्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या घटनेच्या स्मृती अजून ताज्याच असताना अजून एका बस अपघाताची घटना घडली आहे, पूंछ जिल्हात झालेल्या बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात तब्बल ११ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. बुधवारी सकाळी ही घटना घडली आहे. ११ मृत्युंबरोबरच ८ जण जखमी झाले आहेत. पूंछ जिल्ह्यातील सौजियन येथून मंडीकडे ही बस जात होती.
जम्मू - काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी या घटनेवर दुःख व्यक्त करत सर्वच मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ५ लाखांची मदत जाहीर केली आहे. राज्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तातडीने कामाला लागली असून जखमींना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सध्या सुरु आहे. मनोज सिन्हा यांनी जखमींवर योग्य आणि तातडीने उपचारांची व्यवस्था करण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. जम्मू काश्मीर मधील रस्ते अपघातांची मालिका सुरूच राहिली असून एकाच महिन्यातील हा दुसरा अपघात आहे.