‘विक्रांत’ : पहिली स्वदेशी युद्धनौका 2 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात!
23-Aug-2022
Total Views | 49
2
नवी दिल्ली: हिंदुस्थानची पहिली स्वदेशी विमानवाहू युद्धनौका ‘विक्रांत’ पुढील महिन्यात 2 सप्टेंबरला नौदलाच्या ताफ्यात रुजू होणार आहे. कोचीन शिपयार्डमध्ये या युद्धनौकेच्या जलावतरणाचा विशेष सोहळा पार पडणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ही युद्धनौका अधिकृतपणे नौदलात दाखल केली जाणार आहे. 20 हजार कोटी रुपये खर्चून तयार केलेली ‘विक्रांत’ युद्धनौका नौदलाची क्षमता भक्कम करून शत्रूंचा थरकाप उडवणार आहे.
गेल्या महिन्यात अंतिम टप्प्यातील सागरी चाचणी यशस्वीपणे पूर्ण केल्यानंतर कोचीन शिपयार्डने 28 जुलैला नौदलाकडे या युद्धनौकेची डिलिव्हरी केली होती. आता 2 सप्टेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह 'आयएनएस विक्रांत' चे सेवानिवृत्त कर्मचारी, संरक्षण खाते व शिपिंग मंत्रालयाचे अधिकारी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.