राजू श्रीवास्तव 'व्हेंटीलेटर'वर! प्रकृती अद्याप चिंताजनक

राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अधिक चिंताजनक

    19-Aug-2022
Total Views | 51

raju
 
 
 
नवी दिल्ली : प्रसिद्ध कॉमेडियन राजू श्रीवास्तव यांची प्रकृती दिवसेंदिवस चिंताजनक होत चालली आहे. त्यांचे सर्व चाहते, त्यांना बरे वाटावे म्हणून प्रार्थना करत आहेत. काही दिवसांपूर्वी व्यायाम करत असताना श्रीवास्तव अचानक बेशुद्ध झालेत. त्यांना हृदयविकाराचा झटका येऊन गेल्याचे डॉक्टरांनी सांगितले, परंतु आता राजू श्रीवास्तव यांची प्रकृती अधिक चिंताजनक असून डॉक्टरांनी त्यांच्या वाचण्याच्या आशा सोडल्या आहेत असे वाटत आहे.
 
 
 
 
असे असले तरी श्रीवास्तव यांच्या कुटुंबात अद्यापही आशेचा किरण आहे. 'ते एक योद्धा आहे, ते लवकरच बरे होतील,' अशी खात्री त्यांच्या कुटुंबाला आहे. राजू श्रीवास्तव यांना दिल्लीमधील एम्स रुग्णालयात सर्व तज्ञ डॉक्टरांच्या निगराणीत उपचार सुरु आहेत. हृदयविकाराचा झटका येऊन गेल्यानंतर यांच्या मेंदूला सूज आल्यामुळे मेंदूचे कार्य बंद पडले आहे असे डॉक्टरांनी सांगितले.
 
 
 
 
त्यामुळे त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. गेल्या आठ दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत, पण त्यांच्या प्रकृतीत खास सुधारणा दिसत नाही. कोणतेही इन्फेक्शन होऊ नये याची खबरदारी म्हणून त्यांच्यावर उपचार सुरू असलेल्या वॉर्डमध्ये किंवा मजल्यावरही अगदी जवळच्या नातेवाईकांशिवाय कोणालाही सोडलं जात नाही. डॉक्टरांनी आशा सोडल्यामुळे आता त्यांचे कुटुंब आणि चाहते यांना काहीतरी चमत्कार होईल आणि राजू श्रीवास्तव लवकर बरे होतील असा विश्वास आहे.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121