भारतीय लष्कराचे चोख प्रत्युत्तर; चीनला घडवले आपल्या ताकदीचे दर्शन!

    16-Aug-2022
Total Views | 69
 

rs 
 
 
 
नवी दिल्ली: संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत १६ ऑगस्ट रोजी, भारतीय लष्करानं लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेच्या जवळ असलेल्या पेंगॉग लेकमध्ये चीनला आपल्या ताकदीचं दर्शन घडवलं आहे. पेंगॉग लेकमध्ये एक खास बोट उतरवण्यात आली आहे. शिवाय, भारतीय लष्कराला अँटी पर्सनल माइन्स ड्रोन, एके - २०३ रायफल्स आणि एफ इनसास रायफल्सही मिळाल्या आहेत. भारतीय लष्कर या बोटीचा वापर करून लँडिंग क्राफ्ट अटॅक ड्रीलही केले गेले.
 
फायदे :
 
१. बोटीमध्ये एकाचवेळी ३५ जवान चढू शकतात.
२. ३५ सैनिक एकाचवेळी प्रवास करत पेंगॉग लेकच्या कोणत्याही भागात पोहचू शकतात.
३. कमीत कमी वेळात शत्रूच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देऊ शकतात.
 

rs 
 
 
भारतीय लष्कराला एलओसी जवळ सुरक्षा मजबूत करण्यासाठी स्वदेशी तंत्रज्ञानाने बनवलेले ड्रोनही मिळाले आहेत. याच्या मदतीने आजूबाजूच्या भागावर नजर ठेवली जाऊ शकते. राजनाथ सिंह यांनीही गस्त घालण्यासाठी विशेष प्रकारची लढाऊ वाहनंदेखील लष्कराकडे सुपूर्द केली आहेत. ७ लाख भूसुरुंग लष्कराच्या ताब्यात देण्यात येणार आहेत.
 
"ही यंत्रणा आणि उपकरणे भविष्यातील आव्हानांचा सामना करण्यासाठी सैन्याच्या ऑपरेशन तयारीला अधिक बळकट बनवतील." असे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले.
 
 
rs
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121