चाहत्यांनी वाहिली अनिता दातेला श्रद्धांजली

अनिता दातेच्या पोस्टमुळे चाहते हैराण

    08-Jul-2022
Total Views | 58
 
 
 
anita
 
 
 
 
 
मुंबई : झी मराठीवरील 'माझ्या नवऱ्याची बायको' ,अलीकेतून अनेक वर्ष महिलाप्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री अनिता दाते 'मी कुटून राहिले माझ्या नवऱ्याची बायको' असे म्हणत महाराष्ट्राच्या घराघरात पोहचली आहे. या नंतर 'मी वसंतराव' चित्रपटात साकारलेली भूमिका देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली. अनिता दाते नेहमीच आपले नवे प्रकल्प सोशल मीडियाद्वारे आपल्या चाहत्यांपर्यंत पोहचवत असते. परंतु, तिने नुकत्याच केलेल्या एका पोस्टमुळे तिचे चाहते व इंडस्ट्रीतील तिचे मित्र-मैत्रिणी चांगलेच हैराण झाले आहेत, कारण तिने शेअर केलेल्या फोटोमध्ये स्वतःच्याच फोटोला हार घातलेला दिसत आहे. त्यामुळे हा फोटो बघून तिचे फॉलोअर्स अवाक् झाले आहेत. तर काहींनी तिला श्रद्धांजली वाहिली आहेत.
 
 
 
 
 
अनिता दातेने चंदनाचा हार घातलेला तिचा फोटो शेअर करून 'जो आवडतो सर्वांना...', असे कॅप्शन लिहिले आहे. असा फोटो अनितानं का शेअर केला असा प्रश्न सर्वांना पडला आहे. अनिताला काय झालं आहे? असा प्रश्न फक्त तिच्या चाहत्यांनाच नाही तर तिच्या सहकलाकार मित्रांनाही पडलाय. त्यांनी देखील अनिताचा फोटो पाहून चिंता व्यक्ती केलीय.
 
 
 
 
 
अनिता दातेचा हा फोटो पाहून तिचे निधन झाले आहे असा अनेकांचा समज झाला आहे. मात्र असे काही झाले नसून हे तिच्या नव्या प्रोजेक्टचे प्रमोशन आहे. तिची नवी कलाकृती लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. आणि त्यासाठीच हे प्रमोशन सुरु असल्याचे दिसून येत आहे.परंतु हे नेमके नाटक आहे, मालिका आहे की चित्रपट हे अद्याप स्पष्ट झाले नाही.
 
 
 
 
 
तिच्या पब्लिसिटी स्टंटमुळे या पोस्टवर कितीतरी कमेंट्स आल्या आहेत. अभिनेता, दिग्दर्शक प्रल्हाद कुडतरकर यांनी अनिताचे कॅप्शन वाचून लिहिले आहे , 'तो जातो देवाच्या गावाला... कधी परत येतेयस'. तर 'काय हे', म्हणत अभिनेत्री श्रृती मराठेने चिंता व्यक्त केली आहे. तर एका नेटकरी म्हणतोय, 'हे प्रमोशनसाठी असेल तर प्लिज मला सांगा. मला हे खरं वाटत आहे'. तर दुसरा म्हणतोय, 'सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या आहेत ना तुझ्या? नाहीतर पिंडाला कावळा शिवणार नाही...'
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121