...तरी संजय राठोड विरोधात माघार नाही : चित्रा वाघ

    06-Jul-2022
Total Views | 133
 
Chitra Wagh 
 
 
 

पुणे : शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि भाजप एकत्रित येत, एकनाथ शिंदे हे राज्याचे मुख्यमंत्री झाले आहेत. यात ज्या संजय राठोड यांच्यावर आरोप केलेत ते देखील आहेत, त्यामुळे भाजप त्यांच्या बाबतीत भूमिका बदलणार का? अशी चर्चा होत असतानाच भाजपच्या आक्रमक नेत्या चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या विरोधातील आपला लढा सुरु राहील असे आज येथे स्पष्ट केले.

 

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांवर महिलावरील अत्याचार आणि भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यात संजय राठोड यांच्या विरोधात भाजपने आक्रमक भूमिका सातत्याने घेतली आहे. आता त्यांच्यावर ते भाजप सोबत गेल्याने त्यांच्यावर भाजपमधील नेते मंडळी आरोप करणार का असा प्रश्न उपस्थित झाला असताना, चित्रा वाघ यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

 

त्या पुणे जिल्ह्यातील थेउर येथील यशवंत सहकारी साखर कारखान्याच्या मोकळ्या जागेत एका तरुणीचा दगडाने ठेचून खून झाल्याची घटना काल उघडकीस झाल्यावर जिल्ह्यातील लोणी काळभोर पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करण्यासाठी आल्या असताना त्यांनी प्रसार माध्यमाच्या प्रतिनिधीं सोबत संवाद साधला.

 

संजय राठोड यांना पुणे पोलिसांनी क्लिन चीट दिली आहे. त्यावर चित्रा वाघ म्हणाल्या की, “आता हाच प्रश्न तुम्ही पुणे पोलिस आयुक्तांना जाऊन विचारावा, मी माझी लढाई अजून ही लढत आहे. हे प्रकरण कोर्टात दाखल आहे. तसेच पुणे पोलिसांनी कोणत्या आधारे संजय राठोडला क्लिन चिट दिली. याबाबत मला माहिती नसून त्याबद्दल पोलिसांना कोर्टात सांगावे लागणार आहे. त्याच बरोबर आता युतीमध्ये आल्यावर, मी काही केस मागे घेतलेली नाही. माझा हा लढा चालूच राहणार आहे.” अशी भूमिका त्यावर त्यांनी मांडली.


 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121