मुंबई: मुंबई वाहतूक पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुंबई मेट्रोच्या कामासाठी गोरेगाव चेक नाका ते मरोळ नाक्याला जोडणारा आरे कॉलनीतील मुख्य मार्ग मुंबई पोलिसांनी पूर्णपणे बंद केला आहे. गोरेगाव चेक नाक्यावर पोलिसांचा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. हा मार्ग वाहतुकीसाठी २४ तास बंद असणार आहे.
एमएमआरसी व बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या कामामुळे रात्री १२ पासून पुढील २४ तासासाठी आरे रोड वाहतुकीकरिता तात्पुरता बंद ठेवण्यात आला आहे. नागरिकांनी कृपया पवई/मरोळ येथे ये जा करण्यासाठी जेव्हीएलआर मार्गाचा वापर करावा. तर, आरे कॉलनीमध्ये वास्तव करणाऱ्या नागरिकांना आरे रोड वापरण्यास मुभा आहे. जनता व मोटारधारकांनी बदलाची व व्यवस्थेची नोंद घेऊन वाहतूक नियंत्रणामध्ये पोलिसांना सहकार्य करावे. असे वाहतूक पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.