अनुप सोनी यांनी मारली अमृता सुभाषच्या थोबाडीत!

अमृताने सांगितला शूटिंगमधला प्रसंग!

    20-Jul-2022
Total Views | 146
 
sas bahu achar
 
 
मुंबई : बहुआयामी व्यक्तिमत्त्व असलेली अमृता सुभाष या अभिनेत्रीने आता फक्त मराठी चित्रपसृष्टीच नाही तर बॉलीवूडमध्ये देखील आपले नाव पक्के केले आहे. तिचा बोलका आणि निखळ अभिनय प्रत्येकवेळी प्रेक्षकांचे मन जिंकून घेतो. अमृता सुभाष ही मालिका, नाटक, चित्रपटानंतर आता वेब सिरीज मध्ये देखील तिच्या चाहत्यांना दिसून येत आहे. सध्या 'सास बहु आचार प्रायव्हेट लिमिटेड’ या अनुप सोनी यांच्या सिरीज मध्ये अमृता काम करत आहे. या सिरीज मध्ये ती अनुप यांच्या पत्नीची भूमिका साकारत आहे.
  
 
 
नुकत्याच झालेल्या तिच्या एका मुलाखतीमध्ये अमृताने त्यांच्या शूटिंग दरम्यानचा प्रसंग सांगितला. एका सीनमध्ये अमृताला अनुप सोनी यांच्याकडून जोरात थोबाडीत खायची होती. त्यामुळे साहजिकच अमृता थोडी कचरत होती, परंतु अनुप यांनी तिला खूप सहकार्य केले होते. सुरुवातीच्या सीन मध्ये या दोघांचे नाते खूप छान आहे असेही ती सांगतेय.
 
 
 
अमृताला या सिरीजमधल्या एका सीनमध्ये अनुप सोनी यांच्याकडून जोरात थोबाडीत खायची होती. त्यावेळी अमृता जराशी कचरत होती आणि त्यावेळी अनुप यांनी तिला बरीच मदत केली असं ती सांगते. अमृताच्या सुरुवातीच्या सीनमधेच तिचं अनुप यांच्याशी फार सुंदर नातं तयार झाल्याचं ती सांगते.
 
 

sas bahu achar 
 
 
 
या मुलाखतीमध्ये ती पुढे सांगते, “अनुप यांचं पात्र सिरीजमध्ये सगळ्यात कठीण आणि कॉम्प्लेक्स होतं कारण स्वतःच्या बायकोला सोडून दुसरा संसार थाटणं याकडे आजही समाज वेगळ्या दृष्टीने बघतो. माझे सुरुवातीचे सीन हे त्यांच्यासोबत होते. आम्ही ऑन स्क्रीन जितके भांडत होतो तितकेच ऑफ स्क्रीन धमाल करत होतो. आमच्या सुरुवातीच्या काही सीन्समध्ये ते मला थोबाडीत मारतात हा शॉट होता. त्यावेळी मला थोबाडीत मारलेली खरी वाटू द्यायची होती, इमोशनसुद्धा द्यायच्या होत्या आणि भांडण सुद्धा करायचं होतं हे एकत्र कस जमेल याचं मला टेन्शन होतं. पण अनुप इतके ब्रिलियंट अभिनेते आहेत की त्यांनी सांगितलं होऊन जाईल, करू आपण. दोन तीन रिटेक देऊनही हवी तशी प्रतिक्रिया येत नव्हती. आणि फायनल शॉटमध्ये त्यांनी मला अशी थोबाडीत मारली ज्याची मी अपेक्षा केली नव्हती पण त्याच वेळी त्यांनी मारलेला हात मला अजिबात लागला नाही पण एक धक्कादायक प्रतिक्रिया नक्कीच मिळाली. हे अजिबात ठरलेलं नव्हतं आणि त्यांनी ते ऐनवेळी करून हवी ती रिऍक्शन सहजपणे काढून घेतली.”
 
 
 
शेवटी अमृता सांगते ,“एक चांगला अभिनेताच अशा परिस्थितीचा सुवर्णमध्य काढू शकतो ज्यामुळे हवी ती रीॲक्शन सुद्धा मिळून गेली आणि मला अजिबात त्रास झाला नाही.”
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121