असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कुटूंबातील मुलांना शालेय साहित्य वितरण

    07-Jul-2025   
Total Views |

मुंबई : संकल्प संस्था गेली १२ वर्षापासून चेंबूर गोवंडी शिवाजी नगर मानखुर्द या एम/पूर्व विभागात वस्ती विकास प्रकल्प अंतर्गत शैक्षणिक आरोग्य,महिला सक्षमीकरण आणि वस्ती संघटन या विषयावर कार्य करीत आहे. मानखुर्द येथे संकल्प संस्था आणि आरिन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने एम/पूर्व मानखुर्द विभागातील गरजू होतकरू विद्यार्थ्यांना स्कूल बॅग वाटप करण्यात आले. यासाठी संकल्प संस्थाचे अध्यक्ष विनोद हिवाळे तसेच आरीन फाऊंडेशनचे अध्यक्ष नितेश मिसाळ यांनी पुढाकार घेतला.

या कार्यक्रमाचे संकल्प संस्था मधून सविता हेंडवे आणि आरिन फाउंडेशन कडून किरण जाधव यांनी समन्वयक म्हणून कामकाज पाहिले. वनिता सावंत यांनी वस्ती पातळीवर असंघटित क्षेत्रात काम करणार्‍या कुटुंबातील मुलांबरोबर नियोजनबद्ध कार्यक्रमाची आखणी केली. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संकल्प संस्थेचे दीपा गमरे , प्रतिभा सुतार ,उमा चंदनशिवे यांचे विशेष सहकार्य लाभले



योगिता साळवी

एम.ए. समाजशास्त्र. सध्या मुंबई तरुण भारत  येथे वार्ताहर-उपसंपादक पदावर कार्यरत. राजकीय कार्यकर्ता म्हणून प्रदीर्घ अनुभव. विविध सामाजिक प्रश्‍नांच्या अभ्यासाची आवड व लिखाण. वस्त्यांचे वास्तव हे मुंबई तरुण भारतमधील लोकप्रिय सदराच्या लेखिका.