मुंबई : सिक्युरिटीज अँड एक्स्चेंज बोर्ड ऑफ इंडियाने (सेबी) नॅशनल स्टॉक एक्सचेंजचे (एनएसइ) नवनिर्वाचीत व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आशिष कुमार चौहान यांची नियुक्ती केली आहे. यापूर्वी कामकाज सांभाळणारे विक्रम लिमये यांचा पाच वर्षाचा कार्यकाळ १६ जुलै रोजी संपल्याने सेबीकडून हा निर्णय रविवारी (दि. १७ जुलै) घेण्यात आला. येत्या सोमवारी यासंदर्भात औपचारिक घोषणा केली जाईल.
आशिष कुमार चौहान हे सध्या बॉम्बे स्टॉक एक्सचेंजचे (BSE) व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. एनएसइच्या प्रशासकीय मंडळाने आशिष कुमार चौहान यांनी पदभार सांभाळेपर्यंत कंपनीचे कामकाज चालवण्यासाठी अंतर्गत कार्यकारी समितीची स्थापना केली आहे. पदभार सांभाळल्यानंतर ही समिती स्थगित केली जाईल. तत्पूर्वी लिमये यांचा एनएसइ प्रमुख म्हणून पाच वर्षांचा कार्यकाळ संपला असून त्यांची नियमक चौकशी होत आहे.