कवितांच्या सावलीत "नवकोरं"

तरुण कवींना रसिक प्रेक्षकांचा भरभरून प्रतिसाद

    12-Jul-2022
Total Views | 127

 
 
navkora
 
 
 
 

मुंबई : 'नवंकोर' हा कार्यक्रम वायर्ड एक्स्प्रेसन आणि ठीक्करबिल्ला निर्मित, संकल्प थिएटर आणि कल्चरल अकॅडमी मुंबई आयोजित हा कार्यक्रम नुकताच दादर माटुंगा कल्चर सेंटरमध्ये सादर करण्यात आला.
 
 
 
 
मराठी प्रेक्षकांच्या कवितेविषयी असलेल्या भावना लक्षात घेऊन आजवर अनेक कार्यक्रम झाले आहेत. पण, 'नवंकोरं' काहीतरी नवे रसिक प्रेक्षकांच्यासमोर सादर करण्यात आले. नव्या दमाच्या तरुण कवींनी एकत्र येऊन, जुने आणि नवे प्रवाह एकत्र करत कवितांची नवी चळवळ उभारू पाहली. स्वरचित कवितांमधून वेगवेगळे विषय हाताळत स्वतंत्र शैलीत त्यांनी आपल्या कविता सादर केल्या.
 
 
 
 
संकेत अरुण म्हात्रे, प्रथमेश किशोर पाठक, आदित्य प्रवीण दवणे आणि स्पृहा जोशी हे सादरकर्ते आपल्या कविता, गझल, गप्पांमधून प्रेक्षकांना काही नवं देण्याचा प्रयत्न केला. नवीन तसेच ज्येष्ठ कवींच्या कविता या दोन तासांत ऐकायला मिळाल्या रसिक प्रेक्षकांनी भरभरून दाद दिली. या तरुण कवींच्या कवितांचा अनुभव घेतल्यानंतर मराठी साहित्य-काव्य यांचे भविष्य योग्य हातात आहे, त्यांना चांगले दिवस आहेत; असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही.
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121