मुंबई : साऊथ मधील अभिनेत्री रश्मिका मंदाना हिचा आगामी चित्रपटातील फर्स्ट लुक सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. ईदच्या मुहूर्तावर 'सीता रमण' या चित्रपटात आफ्रिनची व्यक्तिरेखा साकारणाऱ्या रश्मिकाचा फर्स्ट लुक पोस्टर सोशल मीडियावर शेअर करताच तिच्या चाहत्यांनी भरपूर प्रतिसाद दिला आहे.
रश्मिकाचा हा लुक दुलकर सलमान याने त्याच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यावेळी रश्मिका एका मुस्लिम महिलेच्या वेशात आहे व 'आदाब' करुन तिने पोज दिली आहे. ईदच्या दिवशीच हा लुक पोस्ट केल्यामुळे चाहत्यांनी या फोटोवर ईदच्या भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.
'सीता रमण' चे दिग्दर्शन हानू रागवापुडी यांनी केले आहे. तर हा रोमँटिक चित्रपट असून या चित्रपटात मृणाल ठाकूर आणि समंथ कुमार प्रमुख भूमिकेमध्ये दिसणार आहेत. 'सीता रमण' ५ ऑगस्टला तेलुगु, तमिळ व मल्याळम भाषेत प्रदर्शित होणार आहे.