पंजाब: पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांना गोळया मारणाऱ्या शार्प शूटर्सची ओळख पटली आहे. मुसेवाला यांना गोळी मारणारे संशयित आरोपी सोनिपतमधील रहिवासी आहेत. प्रियवत फौजी आणि अंकित सेरसा अशी या दोघांची नावे आहेत. फतेहाबादमधील पेट्रोल पंपावरील सीसीटीव्ही फुटेजमध्ये दोन्ही आरोपी गाडीत पेट्रोल भरताना दिसत आहेत.
प्रियव्रत फौजी हा रामकरण टोळीचा शार्प शूटर आहे. त्याच्यावर दोन खुनासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. अंकित सेरसा च्या विरोधात पोलिसांकडे कोणत्याही गुन्ह्याचा इतिहास नाही. सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येप्रकरणी कॅनडामध्ये बसलेल्या लॉरेन्स बिश्नोई आणि गोल्डी ब्रार यांच्या टोळ्यांचीही नावं समोर येत आहेत.