राज्यभर विरोधानंतर 'द वीर दास शो' रद्द!

काही तासातच आला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह

    15-Jun-2022
Total Views |
virdas
अहमदाबाद: वीर दासचा आज दि. १५ रोजी होणारा कार्यक्रम रद्द झाला आहे. परदेशी दौर्‍यांवर आपल्या शोद्वारे भारतविरोधी प्रचारासाठी वीर दास कुप्रसिद्ध आहे.  गुजरातमध्ये कार्यक्रमासाठी जागा मिळणे वीर दास साठी  कठीण झाले आहे. वादग्रस्त 'स्टेज कॉमेडियन'च्या विरोधात गुजरातच्या लोकांची जागोजागी निदर्शने सुरू आहेत.   वापीसह राज्यातील चार शहरांमध्ये त्यांचे शो आयोजित करण्यात आले होते. अखिल भारीत्य विद्यार्थी परिषद आणि इतर हिंदू संघटनांनी या कार्यक्रमाला कडाडून विरोध केला आहे.
वापीमध्ये आज दि. १५ जून रोजी होणारा वीर दासचा शो रद्द करण्यात आला आहे. वडोदरा येथेही अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने दि. १७ जून रोजी होणारा कार्यक्रम रद्द करण्यास सांगितले आहे. तर दुसरीकडे सुरतमध्येही कार्यक्रमात देशविरोधी कारवायांवर 'एबीव्हीपी' जाहीर निषेध करण्याचा इशारा दिला आहे. कॉमेडियन वीर दासचा दि. 17 जून रोजी असलेला कार्यक्रम रद्द करण्याची मागणी करणारे निवेदन वडोदरा येथे अभाविपने जिल्हाधिकारी, महापालिका आयुक्त आणि पोलिस आयुक्तांना दिले. कार्यक्रम रद्द न केल्यास वडोदरा येथे अभाविपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल. असे 'अभाविप'कडून सांगण्यात आले.
विश्व हिंदू परिषदेच्या सदस्यांनी वापी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना असेच निवेदन सादर केल्यानंतर वीर दास शो रद्द करण्यात आला.  विहिंपच्या हस्तक्षेपानंतर वीर दास यांचा वापी शो रद्द करण्यात आला आहे. सुरतमध्ये अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी वीर दास कार्यक्रमाविरोधात आवाज उठवला आहे. कार्यक्रमात कोणत्याही प्रकारे हिंदुविरोधी किंवा भारतविरोधी कारवाया होत असल्याचे आढळल्यास, 'एबीव्हीपी' तसेच इतर हिंदू संघटना कायदेशीर कारवाई करतील. सुरतमध्ये दि. १६ जून रोजी वीर दासाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दि. 15 जून रोजी होणारा वापी शो रद्द झाल्यानंतर, वीर दासने ट्विट केले की त्याला कदाचित कोविड संसर्ग झाला आहे आणि म्हणून तो लवकरच गुजरातमध्ये कधीही शो करणार नाही.