लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी कुटूंबाला सावरकर कळणे अशक्य!

भाजप नेत्या चित्रा वाघ यांचे राहुल गांधींना चोख प्रत्युत्तर!

    13-Jun-2022
Total Views | 92
 
 
aa
 
 
 
मुंबई: नॅशनल हेरॉल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी १३ जून रोजी ईडी कार्यालयात दाखल झाले. यावर भाजपच्या आघाडीच्या महिला चित्रा वाघ यांनी ट्विटर पोस्ट वरून निशाणा साधला आहे. चित्र वाघ म्हणतात की, "५० वर्षांची काळ्यापाण्याची शिक्षा सुनावणाऱ्या 'न्यायाधीशाला तुमचे राज्य तरी ५० वर्षे टिकेल काय?' असे भर न्यायालयात ठणकावून विचारणारे सावरकर; आयुष्यभर लाचारांच्या गराड्यात राहिलेल्या गांधी परिवाराला कळणे अशक्यप्राय आहे."
 
 
 
"राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या... आगे आगे देखो होता है क्या.." असे म्हणत चित्रा वाघ यांनी राहुल गांधींवर घणाघात केला. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांना देखील २३ जून रोजी समन्स बजावले आहेत. मात्र, कोरोनाची लागण झाल्याने त्यांनी वेळ मागितला आहे.
 
 
 
 
 
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121