भारत आयोजित करणार आसियान परराष्ट्र मंत्र्यांची बैठक

    10-Jun-2022
Total Views | 49
 
 
 
S Jaishankar
 
 
 
 
नवी दिल्ली : भारतीद्वारे ६ आणि १७ जून रोजी, विशेष आसियान-भारत परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात येणार आहे. १० जून रोजी आज नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांना माहिती देताना परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते अरिंदम बागची म्हणाले की, भारताने नवी दिल्लीत आयोजित केलेली ही पहिली बैठक असेल आणि ती दिल्ली संवादाच्या १२व्या आवृत्तीसह असेल. दिल्ली संवादाची मुख्य विषय इंडो-पॅफिसिकमध्ये पूल बांधणे आहे, असे ते म्हणाले. मंत्रिस्तरीय सत्राला परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि आसियानचे मंत्री उपस्थित असणार आहेत.
 
 
''आसियान-भारत परराष्ट्र मंत्र्यांची बैठक संवाद संबंधांच्या ३० व्या वर्धापन दिनानिमित्त आणि आसियान सोबतच्या धोरणात्मक भागीदारीच्या १० व्या वर्धापन दिनानिमित्त होईल'', भारताच्या ऍक्ट ईस्ट पॉलिसीच्या मध्यवर्ती असलेल्या आसियानचा उल्लेख करताना श्री बागची म्हणाले. २०२२ हे आसियान-भारत मैत्री वर्ष म्हणून घोषित करण्यात आले आहे, असेही ते म्हणाले. चीनच्या बाजूने असलेल्या सीमा विवादाच्या मुद्द्यावर श्री बाम्हणाले, गची भारत चीनच्या बाजूने पायाभूत सुविधांच्या उभारणीसह सीमावर्ती भागातील घडामोडींवर बारकाईने लक्ष ठेवतो. ''प्रादेशिक अखंडता आणि सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे आणि सर्व योग्य उपाययोजना करत आहे'', असे ते म्हणाले.
 
अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121