मुंबई : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांची रुग्णालयात भरती होण्यासाठीची विनंती ईडीने फेटाळली आहे. अनिल देशमुखांनी त्यांच्यावर होणाऱ्या शस्त्रक्रियेसाठी आणि उपचारांसाठी खासगी रुग्णालयात भरती होण्यासाठी परवानगी मागितली होती, पण ही विनंती ईडीने फेटाळली आहे.
प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांचे निवासस्थान असलेल्या अँटिलीयाच्या बाहेर गाडीत स्फोटके ठेवल्याच्या प्रकरणात आणि खंडणीखोरीच्या प्रकरणात अनिल देशमुख अटकेत आहेत. याच बरोबर ठाण्यातील व्यावसायिक मनसुख हिरेन आणि पोलीस दलातील सचिन वाझे प्रकरणातही अनिल देशमुख यांच्यावर आरोप आहेत.