नवी दिल्ली: मार्च महिन्यातील जीएसटी कर संकलनाने १.४२ लाख कोटींचा विक्रमी टप्पा गाठला आहे. त्याच वेळी तेल कंपन्यांनी पेट्रोल डिझेलच्या दरांमध्ये वाढ केली असल्याने देशात महागाईचा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. वाढलेल्या दरांमुळे पेट्रोल डिझेलच्या किमतींनी पुन्हा एकदा १००चा टप्पा पार केला आहे. याच पार्श्वभूमीवर देशातील नागरिकांना या महागाईपासून दिलासा मिळवा या करीता केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
सहा महिन्यांपासून साततयाने १ लाख कोटींहून जास्त जीएसटी संकलन होते आहे. मार्च महिन्यातील जीएसटी संकलनाने विक्रमी टप्पा गाठला आहे. दिवाळीतसुद्धा पेट्रोल डिझेलचे भाव वाढल्यानंतर केंद्र सरकारने इंधनांवरील करांमध्ये कपात केली होती याहीवेळी असाच निर्णय घेतला जाण्याचे सूतोवाच होत आहे. याचबरोबरीने जीएसटी करांच्या स्लॅब्स मध्येही बदल केले जाण्याची शक्यता आहे. यामुळे सरकार आत नागरिकांना दिलासा देणारा हा निर्णय कधी घेतोय याकडे लक्ष लागले.