नेता शिवसेनेचा! राष्ट्रवादीच्या तालावर नाचतो, भाजपच्या नावानं शिमगा करतो!

    25-Apr-2022
Total Views | 116

Keshav Upadhye
 
 
मुंबई : "रोज सकाळी राष्ट्रवादीच्या तालावर शिवसेनेचा नेता माध्यमांसमोर नाचत असतो. भाजपच्या नावानं शिमगा करायचा एककलमी कार्यक्रम मालकांनी दिला असून त्यांना खुश करण्याचा प्रयत्न करत असतो.", असे म्हणत भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका केली आहे. सोमवारी समाजमाध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये त्यांनी याबद्दल लिहिल्याचे दिसत आहे. 'ठाकरे सरकारविरुद्ध बोला आणि केंद्राची सुरक्षा मिळवा', ही ऑफर नसून ठाकरे सरकारच्या दहशतीला चाप बसवण्याचा लगाम असल्याचेही त्यांनी यात म्हटले आहे.
 
 

"ठाकरे सरकार विरोधात कोणी बोललं किंवा मुख्यमंत्र्यांना कोणी आव्हान दिलं म्हणून राजद्रोहाचा खटला दाखल केला जातो. त्यामुळे असे कृत्य करणाऱ्यांचा आणखी किती काळ सत्तेचा माज राहील सांगता येत नाही.", असे केशव उपाध्ये यांनी म्हटले. यावेळी त्यांनी षण्मुखणंद येथेल झालेल्या लता मंगेशकर पुरस्काराच्या कार्यक्रमसंदर्भात मंगेशकर कुटुंबियांवर आरोप करणाऱ्यांनाही लक्षकेंद्रित केले.



"सत्तेसाठी आंधळे झालेले काही महाभाग नेते स्वत:च्या स्वार्थासाठी भारतरत्न लता मंगेशकर यांच्या कुटुंबीयांवर १२ कोटी जनतेचा अपमान केल्याचा आरोप करत आहेत. मग नवाब मलिक, अनिल देशमुख, सचिन वाझे यांनी अभिमानास्पद कामगिरी केलीय का? माध्यमांत चर्चेत राहण्यासाठी भाजपाविरोधात वाटेल ते बोलत राहणं ही सवय मुलुंडपासून मुंब्रापर्यंत नेत्यांना जडलीय. भाजपा नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या दगडफेकीचं समर्थन करताना जर भविष्यात खरोखरच भ्रष्टाचारी नेत्यांवर कुणी दगडफेक, चप्पला फेकल्या तरी निषेध करू नये म्हणजे झाले.", असेही ते पुढे म्हणाले.
 
 
 

अग्रलेख
जरुर वाचा

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121