मुंबई : चिपी विमानतळ सुरु झाल्यापासून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना दिलासा मिळाला आहे. मात्र एअर इंडियाची धुरा ही आता टाटा कंपनीच्या हातात असल्यामुळे एअर इंडियाने आपल्या साईटवरून तिकीट बुकिंग बंद केले आहे. त्यामुळे आता विमानाचे तिकीट कसे आरक्षित करायचे हा प्रश्न सध्या कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना पडला आहे. चिपी या विमानतळासाठी सेवा देणाऱ्या 'अलायन्स एअर' या कंपनीच्या वेबसाईटवरून कोकणात जाणारे प्रवासी तिकीट बुकिंग करू शकतात. या संबंधी अधिक माहिती पुढीलप्रमाणे -
१. 'अलायन्स एअर' या कंपनीच्या वेबसाईटवरून कोकणात जाणारे प्रवासी तिकीट बुकिंग करू शकतात
२. www.allianceair.in या वेबसाईटवर तिकीट बुकिंग उपलब्ध आहे.
३. उडान योजनेअंतर्गत ३५ सीट्स राखीव
४. रु. २४२५/- हा तिकीट दर उडान योजनेअंतर्गत राखीव असणाऱ्या ३५ सीट्ससाठी असेल.
५. या ३५ जागांव्यतिरिक्त जागांसाठी तिकीट दर कंपनीच्या दराप्रमाणे उपलब्ध असेल.
६. बुधवार, शुक्रवार आणि रविवार या दिवशी सिंधुदुर्ग विमानतळावरून सकाळी ९.५५ वाजता विमान सुटेल.
७. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार या दिवशी दुपारी १.५० वा. विमान सुटेल.