मुंबई : "राज्य सरकारला मशिदींवरचे अनधिकृत भोंगे उतरवावेच लागतील. प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र ज्या मशिदींच्या बाहेर अनधिकृत भोंगे लागतील त्याच्यासमोर दुप्पट आवाजात हनुमान चालीसा लावली जाईल.", असे म्हणत मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी सुद्धा मशिदींबाहेरच्या अनधिकृत भोंग्यांविषयी अखेर वाचा फोडली. गुढीपाडवा निमित्त शनिवारी (दि. २ एप्रिल) मनसेकडून शिवाजी पार्क येथे आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात ते बोलत होते. "मी धर्मांध नाहीये, मी धर्माभिमानी आहे. माझा कोणाच्या प्रर्थानेला विरोध नाही. पण तुम्हाला तुमच्या परमेश्वराची प्रार्थना करायची असेल, निश्चिंत करा; पण तुमच्या घरात! भोंगे वाजवून नाही!", असेही ते पुढे म्हणाले.