प्रवीण दरेकर यांना अटकपूर्व जामीन मंजूर

    13-Apr-2022
Total Views |
 
 
darekar
 
 
मुंबई : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि मुंबई मध्यवर्ती जिल्हा बँकेचे संचालक प्रवीण दरेकर यांना मुंबई बँकेच्या बोगस मजूर प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने मंगळवारी दिलासा देत अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. निकालानंतर दरेकर यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे स्वागत केले व महाविकास आघाडी सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “पहिल्या दिवसापासून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह मुख्यमंत्री कार्यालय आणि पोलीस आयुक्त हे काही लोकांना हाताशी धरून माझ्याविरुद्ध कट रचत होते. या सगळ्यांचे ‘सीडीआर’ तपासले तर नेमके कसे कारस्थान रचले हे लक्षात येईल,” असा गंभीर आरोप विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी केला.
 
 
ते पुढे म्हणाले की, “आज मुंबई उच्च न्यायालयाने आम्हाला न्याय दिला आहे. कारवाई करून सरकार आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, हे जेवढा अन्याय करतील तेवढ्या जास्त ताकदीने मी या सरकारच्या कारभारावर ताशेरे ओढणार आहे.महाविकास आघाडी सरकारच्या दबावाखालीच हे सर्व षड्यंत्र होते. आणि गुन्हा दाखल करून या सरकारचा अडकवण्याचा डाव होता. विरोधी पक्षनेता म्हणून या सरकारचे भ्रष्टाचार, घोटाळे, याचा पर्दाफाश करण्याचे काम मी करत होतो. त्याचा सूड उगवण्याचे काम अशा प्रकारच्या कारवाईतून सरकारला करायचे होते. सरकारचे मंत्री तुरुंगात आहेत, मग भाजपचे जे नेते आरोप करत आहेत, आपणही त्यांना उत्तर दिले पाहिजे, अशा प्रकारची महाविकास आघाडीची ‘स्ट्रॅटेजी’ ठरली. संजय राऊत यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून दबाव आणला आणि नाईलाजाने गृहमंत्री आणि गृहखाते कार्यान्वित झाले आणि किरीट सोमय्या यांच्याविरोधात व माझ्याविरोधात तक्रारी करण्यात आल्या आणि गुन्हे दाखल झाले आणि कारवाईचा ससेमिरा लावला. परंतु, न्यायालयाने हे झिडकारून लावले आणि आम्हाला न्याय दिला,” असेही दरेकर यांनी स्पष्ट केले.
 
 
चित्रा वाघ या लढणार्‍या नेत्या!
 
 
“चित्रा वाघ एक लढणार्‍या नेत्या आहेत. ‘आफ्टर थॉट’ ज्या ‘स्टेटमेंट’ येतात त्या सरकार आपला प्रभाव वापरून करायला लावत असल्याचे माझे स्पष्ट मत आहे. पीडितेची उलट ‘स्टेटमेंट’ आता आली असेल, तर तो सरकारचा दबाव आहे. चित्रा वाघ या महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणार्‍या नेत्या आहेत. चित्रा वाघ पुराव्यानिशी बोलतात. महिलांच्या अत्याचाराविरोधात काम करतात. अशा लढणार्‍या नेत्याविरोधात त्यांना अशा प्रकारे आरोपीच्या पिंजर्‍यात ‘प्लान’ करून उभे करणे महिलांसाठी योग्य नाही,” असेही दरेकर यांनी सांगितले.
अग्रलेख
जरुर वाचा
सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्यायासाठी परखड आवाज : आमदार अमित गोरखे

सामाजिक न्याय या मूल्याला कृतीत उतरवण्यासाठी आणि अनुसूचित जाती-जमातींच्या प्रश्नांना विधायक वळण देण्यासाठी ज्यांनी जनमानसाशी थेट संवाद ठेवला, अशा आ. अमित गोरखे यांना २०२५ सालच्या पावसाळी अधिवेशनात विधान परिषदेचे तालिका सभापती म्हणून पहिल्यांदाच कामकाज पाहण्याची संधी मिळाली. या विशेष अनुभवाबरोबरच त्यांनी ‘सरकारची भूमिका’, ‘उपवर्गीकरणाचा मुद्दा’, ‘अस्पृश्यतेचे प्रश्न’, ‘धर्मांतरविरोधी धोरण’ आणि ‘महाराष्ट्र जनसुरक्षा कायदा’ यांसारख्या संवेदनशील विषयांवर अत्यंत स्पष्ट आणि ठाम भूमिका मांडली. दै. ‘मुंबई तरुण ..

Email

admin@mahamtb.com

Phone

+91 22 2416 3121