मुंबई: मल्टिप्लेक्स उद्योगात मोठे नाव असणाऱ्या पीव्हीआर आणि आयनॉक्स यांनी विलनीकरणाची घोषणा केली आहे. दोन्ही कंपन्यांच्या संचालक मंडळाच्या बैठकीनंतर या कराराला मंजुरी देण्यात आलेली आहे. पीव्हीआर आयनॉक्स लिमिटेड असे या नवीन कंपनीचे नाव असून पीव्हीआरचे संस्थापक अध्यक्ष अजय बिजली हेच या नव्या कंपनीचे अध्यक्ष असणार आहेत.
कोरोना काळात चित्रपटगृह व्यवसायाचे मोठे नुकसान झाले होते. तसेच या चित्रपटगृहांबरोबरीने आता अमेझॉन, नेटफ्लिक्स यांसारखे ओटीटी प्लॅटफॉर्म्ससुद्धा स्पर्धेत आले आहेत या स्पर्धेला तोंड देण्यासाठीच या दोन मोठ्या कंपन्यांनी एकत्र येण्याचा निर्णय घेतला आहे. नवीन कंपनी आता एकत्रितपणे १५०० स्क्रीन्सची मालक असणार आहे.