नवी दिल्ल्ली : युक्रेनवर रशियाचे आक्रमण सातव्या दिवसात दाखल झाले असून आतापर्यंत किमान १४ मुलांसह ३०० हून अधिक नागरिकांचा मृत्यू झाला आहे, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी मंगळवारी सांगितले.तथापि, रशियाला कठोर निर्बंध आणि जागतिक निषेधाचा सामना करावा लागत आहे.
रशियाने सांगितले आहे की ते 'सर्व उद्दिष्टे' साध्य होईपर्यंत युक्रेनशी सुरु असलेले युद्ध थांबवू शकत नाहीत असे रशियन संरक्षण मंत्री यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. मंगळवारी पंतप्रधान मोदींनी युरोपीय परिषदेचे अध्यक्ष एच.ई. चार्ल्स मिशेल यांच्याशी कॉल दरम्यान, युक्रेनमधील बिघडत चाललेली परिस्थिती आणि मानवतावादी संकटाबद्दल दुःख व्यक्त केले आहे.