अमरावती : राज्याचे मागास प्रवर्ग कल्याण राज्यमंत्री बच्चू कडू यांना चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने आज दोन महिने सश्रम कारावसासह पंचविस हजार रुपसे दंडाची शिक्षा सुनावली आहे. मुंबईतील एका फ्लॅटची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवल्याचा गुन्हा बच्चू कडू यांच्या विरोधात दाखल करण्यात आला आहे.
2014 च्या विधानसभा निवडणुकीवेळी मुंबईतील एका फ्लॅटची माहिती प्रतिज्ञापत्रात लपवली असल्याची तक्रार भाजपा नगरसेवक गोपाल तिरमारे यांनी 2017 साली केली होती. त्यानंतर या प्रकरणात चौकशी पूर्ण झाल्यावर ११ फेब्रुवारी रोजी चांदूरबाजार प्रथम वर्ग न्यायालयाने राज्यमंत्री बच्चू कडू दोषी असल्याचे जाहिर केले आहे. त्यानंतर न्यायालयाने याप्रकरणात बच्चू कडू यांना दोन महिने सश्रम कारावासाची शिक्षा सुनावली आहे.