पुणे : कर्नाटक मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे फोटो असणाऱ्या व MH च्या गाड्यांची तोडफोड केल्याप्रकरणी खेड शिवापूर टोल नाक्यावर स्वराज्य संघटनेच्या वतीने जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. कर्नाटकातील वाहनांवर स्वराज्य संघटनेचे स्टिकर लावण्यात आले तसेच गाड्यांवर जय महाराष्ट्र लिहून कन्नडिकांचा निषेध नोंदविण्यात आला.
दरम्यान, गाडीच्या चाकातील हवा काढणे, गाडीवर भगव्या रंगाने जय महाराष्ट्र लिहिणे अशी निदर्शने दिसली. मात्र या सर्वाचा त्रास प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागत आहे. यावेळी संघटनांकडून 'जय भवानी, जय शिवाजी' अशा घोषणाही देण्यात आल्या.